कणकवली आचरा मार्गावर कोसळलं झाड ; वाहतूक ठप्प

कणकवली आचरा मार्गावरील कलमठ येथे भले मोठे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने आचरा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हे झाड विद्युत खांबांवर पडल्याने चार विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे कलमठ गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून झाड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे.

यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री ,पप्पू गावडे ,रोहित चिंदरकर ,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना झाड पडल्याची माहिती पळवली आहे तसेच विद्युत विभागालाही याची माहिती दिली आहे.


Courtesy : Sindhudurg Live

Post a Comment

Previous Post Next Post