देवगड मधील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली


काल रात्री दि ३ ऑगस्ट २०२०रोजी विजयदुर्ग किल्ल्याची जीबी चा दरवाजा ते मुख्य द्वार यामधील चिलखती तटबंदी कोसळली. ८१५ वर्षाचा हा जिवंत इतिहास आता कणकणाने ढासळत चालला आहे. विजयदुर्गची ही अवस्था बघवत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली. साधारणपणे 30 ते 40 फूट भागातील ही तटबंदी कोसळली. समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. सकाळी किल्ल्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास सदर बाब आली. त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली. पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करणार येणार आहेत. तर दुसरीकडे समुद्रात बुरुजाची पडझड होत आहे. हा बुरुज समुद्राच्या पाण्यात असल्याने या बुरुजाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी किल्लेप्रेमी कडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post