‘मांडवी’ला जोडले चुकीचे डबे!

प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी म्हणून आणलेल्या नव्या कोऱया LHB गाडीला जे सामान्यश्रेणीचे (जनरल) डबे जोडले आहेत ते चुकीचे असल्याने प्रवाशाला नाहक त्रास होत आह़े मुळात द्वितीय श्रेणी बैठक यान (सेकंड सिटींग) श्रेणीचे डबे कोकण रेल्वेने सामान्य श्रेणीला बसवल्याने अवघ्या 72 तासात या नव्या नवलाईच्या गाडीच्या नावाने ‘शिमगा’ सुरू झाला आह़े

मुंबई-पुणे मार्गावर पहाटे पुश-पुल पद्धतीने धावणाऱया इंटरसिटी एक्सप्रेससाठी बनवलेले द्वितीय श्रेणी कुर्सीयान (सेकंड सिटींग) डबे कोकणकन्या/मांडवी एक्सप्रेसमध्ये जनरल श्रेणीचे करण्यात आले आहेत़ या डब्यात 3×2 पद्धतीच्या खुर्च्यांची बैठक व्यवस्था असून मध्यभागी टेबल सदृष्य फळी आह़े 49 ते 60 या क्रमांकाची आसने या टेबलाभोवती समोरासमोर असून अर्धी आसने एका दिशेने व उरलेली विरूद्ध दिशेने आहेत़ टॉयलेट ब्लॉकच्या 4 जागांपैकी 1 जागा ही खानपान सेवेच्या खाद्यपदार्थ साठवणे, गरम करणे यासाठी असत़े

हे डबे मुळात 4 तासापर्यंत प्रवास असणाऱया जलद गाडय़ांसाठी बनवले आहेत़ पण कोकण रेल्वेवर हेच डबे जनरल म्हणून वापरले आहेत़ परिणामी जुन्या निळ्या रंगाच्या जनरल डब्यातील समोरासमोर बाकसदृष्य बैठक व्यवस्था मोडीत निघाली आह़े जुन्या निळ्या डब्यात 108 च्या जागी 144-150 जण बसत असत आणि जवळपास 130 जण पॅसेज, टॉयलेट जवळची जागा, 2 बाकडय़ातील जागा या ठिकाणी उभे राहत असत़ म्हणजे कोकणकन्या/मांडवीच्या 4 जनरल आणि 2 SLR डब्यातून मिळून 1100 प्रवासी गर्दीच्या काळात प्रवास करत़

सामानाच्या रॅकवरून प्रवास

नव्या LHB  कोचमध्ये बैठक व्यवस्थेत 108 खुर्च्यांवर फक्त 108 जणच बसत असल्याने आणि मधल्या पॅसेजमध्ये 100 जणच उभे राहू शकत असल्याने जनरल तिकीटावरील प्रवाशांनी डोक्यावरील रॅकचा उपयोग बसायला सुरू केला आह़े
(फोटो पहावा) तसेच मधल्या सर्व्हिस टेबलवर 10 जण बसतात़ सामान ठेवणे अडचणीचे झाले आह़े या जनरल डब्यातील पंखे हे फक्त खुर्च्यांच्या रांगांवर केंद्रीत असल्याने मधल्या पॅसेजमधील उभ्या प्रवाशांना हवा लागत नाह़ी तसेच स्लायडींग खिडक्या असल्याने गाडीत विशेष वायुवीजन न झाल्याने गार्ड शेजारील 21 व्या डब्यात धूर कोंडण्याच्या घटना लांब बोगद्यात घडत आहेत़ नातूवाडी, कामथे, रानपाट, करबुडे, टिके, आडवली, बोर्डवे या बोगद्यात धूर कोंडल्याने प्रवाशांना खोकल्याचा त्रास होत़ो

जनरलमध्ये जनरेटरचा त्रास

नव्या रूपातील LHB गाडीची ब्रेक यंत्रणा ही दोन्ही टोकाच्या ब्रेक कम जनरेटर व्हॅनवर अवलंबून असल्याने इंजिनापासून दुसरा आणि एकविसावा जनरल डबा यामधील प्रवाशांना जनरेटरच्या धडधड आवाजाचा त्रास होत़ो कोकणकन्या रात्रीच्या वेळेत 7 तास धावते आणि एकूण 12 तास प्रवास करत़े तीच अवस्था मांडवीची असून मांडवी मुंबईकडे जाताना 14 तास तर मडगावला येताना 13 तास धावत़े सध्या जे जनरल म्हणून लावलेले सेकंड सिटींग डबे आहेत ते इतक्या वेळेच्या प्रवासासाठी बनवलेलेच नाहीत़ 3-4 तास अंतराच्या प्रवासाचे डबे जर 12/13 तासांसाठी वापरले तर प्रवासी हैराण होणारच़

गर्दीमुळे टीसी गायब

जनरल डब्यात जागा उपलब्ध नसल्याने प्रवासी सरळ बाजूच्या शयनयानात घुसतात तसेच एसी डब्यात शिरता येत नसल्यामुळे पॅण्ट्रीकार शेजारील 5-1 पासून जागा शोधतात़ रात्री मुंबईकडे जाणाऱया ‘कोकणकन्या’चे 2 जनरल डबे कुडाळ स्टेशनवरच ओव्हरपॅक झाल्याने कणकवलीपासून जनरल तिकिटवाले स्लीपरमध्ये आक्रमण करतात़ त्याना आवरणे हे एकटय़ा टीसीचे काम नसल्याने सध्या कोकणकन्या (अप) मधून टीसी गायब असतात़ रत्नागिरी-चिपळूण-खेड ही तोबा गर्दीची स्थानके असल्याने प्रवाशांत भांडणे होत आहेत़ स्लीपर क्लास आरामदायी असला तर प्रशस्त जागेमुळे जनरल तिकिटवाले किमान 30-40 जण हे स्लीपरमधील पॅसेजमधील जागा व्यापतात आणि झोपलेल्या रिझर्व्हेशन धारकांना प्रचंड मनस्ताप होत आह़े

इंदूर-कोचुवेली, बिकानेर- कोचुवेली आणि 17 मे 2019 पर्यंत धावलेली LTT कोचुवेली या गाडय़ांचे जनरल डबे हे LHB असून वेगळ्या पद्धतीने त्या डब्यात बाक सदृष्य बैठक व्यवस्था असल्याने जनरल तिकिटधारक प्रवाशाला कोणताच त्रास होत नाह़ी कोकण रेल्वे प्रशासनाने त्वरित यात लक्ष घालून जनरल डब्यात बदल करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आह़े

मडगाव-बांद्रा नव्या गाडीची मागणी

जुन्या निळ्या रंगाच्या ICF 3 गाडय़ा आता सेवेतनू काढल्या आहेत़ त्या 3 गाडय़ांचे 69 डबे अधीक 3 पॅण्ट्रीकार सायडींगला टाकल्या आहेत़ त्या गाडय़ांची फेरजुळणी करून मडगाव-बांद्रा टर्मिनस अशी दोन्ही बाजूने रात्री सुटणारी गाडी वसई-बोरीवली मार्गे सुरू केल्यास पश्चिम उपनगरातील प्रवाशांची सोय होईल आणि कोकणकन्या वरील ताण कमी होईल असे प्रवाशांचे म्हणणे आह़े नव्या गाडीची नवलाई 9 दिवस सुद्धा न राहता 72 तासात त्या गाडी विरूद्ध नाराजी आली आह़े याची रेल्वे प्रशासनाने त्वरीत दखल घेणे, गरजेचे आह़े.

Courtesy : Tarun Bharat
Editor : Parashuram Patil

Post a Comment

Previous Post Next Post