चीनची आणखी एक बोट दाभोळ समुद्रात दाखल

रत्नागिरी : खराब वातावरणामुळे दाभोळनजीक समुद्रात अडचणीत सापडलेल्या चीनच्या बोटींपैकी आणखी एक बोट मंगळवारी सायंकाळी दाभोळ बंदरात आणून उभी करण्यात यश आले आहे. यामुळे बंदरात आलेल्या बोटींची संख्या 3 वर पोहोचली आहे. उर्वरित 7 बोटी अद्याप समुद्रात असल्याचे बंदर अधिकारी पॅप्टन संजय उगलमुघले यांनी सांगितले.


 चीनच्या बोटी दाभोळ समुद्रकिनारी आल्या असून त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली होती. खराब वातावरणामुळे बोटींची तपासणी खोल समुद्रात होवू शकली नसली तरी आता सुरक्षा यंत्रणा ती तपासणी करणार आहे.

Courtesy: Tarun Bharat
प्रतिनिधी Parashuram Patil

0 comments:

Post a Comment